IMPIMP

Sachin Waze | सचिन वाझेचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज विशेष कोर्टाकडून मंजूर; अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ?

by nagesh
Sachin Waze | anil deshmukh money laundering case sachin wazela declared amnesty witness ready to give all information to cbi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sachin Waze | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) हे माफीचा साक्षीदार होण्यासाठी सीबीआयने मंजुरी दिली होती. तसेच, माफीचा साक्षीदार होण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर अटीची पुर्तता करावी लागणार होती. ही पुर्तता आता झाली आहे. सचिन वाझे यांचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाकडून (Special CBI Court) मंजूर करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सचिन वाझेंना (Sachin Waze) माफिचा साक्षीदार घोषित केल्याने आता अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाझेला आज (बुधवारी) सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर व्हीसीच्या माध्यमातून हजर करण्यात आलं होतं. त्यामध्ये सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित केलं आहे. त्याचबरोबर 7 जून रोजीच्या सुनावणीदरम्यान वाझेला प्रत्यक्ष न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

या दरम्यान, कथित भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.
तसेच सीबीआयनेही मंजुरी दिली आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी केली आहे.
त्याचबरोबर आता वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

 

Web Title :- Sachin Waze | anil deshmukh money laundering case sachin wazela declared amnesty witness ready to give all information to cbi

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले – ‘पैशांचं…’

Sanjay Raut And Vasant More | पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट; ‘तात्यां’ च्या कामाचं केलं तोंडभरुन कौतुक !

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार; हडपसर पोलिसांकडून नराधमाला अटक

 

Related Posts