IMPIMP

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut replied to raj thackeray statement regarding uddhav thackderay and corona death

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी पूर्व येथे होणारी पोटनिवडणूक (Andheri By-Election) बिनविरोध व्हावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून विनंती केली होती. त्यानंतर विचारपूर्वक भाजपने (BJP) आपला उमेदवार मागे घेतला आहे. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर भाष्य केले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीवर राज ठाकरेंनी भाजपला लिहिलेले पत्र म्हणजे केवळ स्क्रिप्टचा भाग आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर राज ठाकरेंनी भाजपला लिहिलेले पत्र केवळ स्क्रिप्टचा भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता. त्यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला आहे. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्याने भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच भाजपने या मतदार संघात वैयक्तित सर्वे केला होता. त्यामध्ये ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा भरघोस मतांनी विजय होणार याची त्यांना माहिती मिळाली, त्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला, अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यामांना दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ गैरव्यवहारात (Patrachal Land Scam) सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांना आज न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता, त्यांनी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

अंधेरी येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली होती.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील पत्रकार परिषद घेत
निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले होते.
त्यावर भाजपने विचार करुन आपला अधिकृच उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे कळविले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

 

Web Title :- Sanjay Raut | raj thackeray s letter to bjp on andheri east by election is part of script says shivsena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime | 20 कोटीच्या खंडणी प्रकरणात कुख्यात गुंड गज्या मारणे ‘गोत्यात’, 12 दिवसांची पोलीस कोठडी

MNS Chief Raj Thackeray | अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यावर राज ठाकरेंचे फडणवीसांना पुन्हा एकदा पत्र

 

Related Posts