IMPIMP

Nashik Crime | पोलीस हवालदाराची रेल्वेखाली आत्महत्या, नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ

by nagesh
Nashik Crime | nashik police constable suicide under railway track

नाशिक / पंचवटी : सरकारसत्ता ऑनलाइनNashik Crime | नाशिक पोलीस दलात (Nashik Police Force) कार्यरत असणाऱ्या एका पोलीस हवालदाराने रेल्वेखाली (Under Railway) आत्महत्या केल्याची (Police Constable Suicide) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) कार्यरत असलेले पोलीस हवालदार अनिल तानाजी जमधाडे (Anil Tanaji Jamdhade) (वय-50) असे आत्महत्या (Nashik Crime) केलेल्या पोलिसाचे नाव आहे. जमधाडे यांनी गुरुवारी (दि.24) दुपारी ओढा रेल्वे रुळावर आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनिल जमधाडे हे दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) मातेरेवाडी (Materewadi) येथील रहिवासी होते. सध्या ते पंचवटी येथील रासबिहारी लिंक रोडवरील (Rashbehari Link Road) मानेनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik Crime)

 

 

अनिल जमदाडे हे 1991 मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते.
मनमिळावू स्वभावाच्या जमदाडे यांच्या निधनामुळे पोलीस वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास आडगांव पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Nashik Crime | nashik police constable suicide under railway track

 

हे देखील वाचा :

Urinary Tract Infections (UTI) | महिलांनी टॉयलेट सीटवर केली ही एक चुक तर ‘या’ आजाराला पडू शकतात बळी, डॉक्टरांनी दिला इशारा

Pragya Jaiswal Bralette Photo | सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या साऱ्या हद्दपार, ब्रालेट घालून फोटो केले शेअर..

Pune Crime | PhonePe द्वारे पैसे दिल्याचे भासवून 9 सराफांना गंडा ! पुणे पोलिसांकडून एकाला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Nawab Malik | ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल

 

Related Posts