IMPIMP

आता आधारकार्डावरील पत्ता बदलता येणार तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

by bali123
aadhaar card update now you can change address without documents check steps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या बहुतांश ठिकाणी आधारकार्ड aadhaar card बंधनकारक करण्यात आले आहे. या कार्डच्या माध्यमातून अनेक कामे कोणत्याही अडथळ्याविना होऊ शकतात. अनेकदा आपल्याला आधारकार्डवरील माहिती अपडेट करायची असते. पण कशी करावी माहिती नसते. त्यामुळे आता तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही कागदपत्रांविना पत्ता बदलू शकता.

आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी रहिवासी पुरावा असणे आत्तापर्यंत आवश्यक होते. मात्र, आता तुम्ही आधारकार्ड व्हेरिफायरच्या मदतीनेही आधारकार्ड अपडेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी व्हेलिडेशन लेटरसाठी अप्लाय करावा लागणार आहे. https://resident.uidai.gov.in या वेबसाईटवरून Aadhaar Update Section मध्ये दिलेल्या Request Aadhaar Validation Letter सिलेक्ट करावे लागणार आहे.

Request Aadhaar Validation Letter सिलेक्ट केल्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्ट (SSUP) विंडो ओपन होईल. या सर्व प्रोसेसनंतर तुम्हाला 12 अंकी आधारक्रमांकासह लॉग-इन करावे लागणार आहे. OTP किंवा Captcha Code टाकून व्हेरिफाय करावे लागणार आहे. नंतर तुम्हाला Service Request नंबर मिळेल. त्यानंतर Log-in करून पत्ता तपासावा लागणार आहे.

तुमचा पत्ता योग्य असल्यास तुम्हाला तो Submit करावे लागणार आहे. हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक लेटर मिळेल. त्यानंतर Verification कडे एक Secret Code ही पाठवला जाईल. तुम्हाला पुन्हा एकदा Proceed to Update Address वर क्लिक करावे.

आधार क्रमांकाच्या माध्यमातून Log-In करता येऊ शकते. तसेच Update Address via Secret Code चा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पत्ता पुन्हा तपासून Submit करावा लागणार आहे. अशा पद्धतीने तुमचा पत्ता अपडेट होईल.

Related Posts