IMPIMP

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

by pranjalishirish
coronavirus new zealand temporarily suspends entry for all travellers from india

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वेगाने वाढणार्‍या या प्रकरणांमध्ये आता न्यूझीलंडने  New Zealand एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडमध्ये भारतातून आलेल्या लोकांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारी न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी हा निर्णय घेतला. हे निर्बंध न्यूझीलंडच्या नागरिकांवर देखील लागू होईल जे काही कारणास्तव सध्या भारतात आहेत अशा लोकांनाही लागू होईल. न्यूझीलंड सरकारने सांगितले की, भारतातून येणाऱ्या लोकांवर बंदी 11 एप्रिलपासून सुरू होईल आणि ती 28 एप्रिलपर्यंत सुरू राहतील. या दरम्यान सरकार प्रवास पूर्ववत करण्याच्या इतर मार्गांवर विचार करेल.

‘माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

दरम्यान न्यूझीलंडने New Zealand  यापूर्वीही इतर अनेक देशांमधील प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. या यादीमध्ये भारताचाही समावेश होता. मात्र, मध्यंतरी प्रकरणांत घट झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु पुन्हा वाढती प्रकरणे आणि साथीची दुसरी लाट भारतात कायम असल्याने न्यूझीलंडने New Zealand हा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन दिवसांत भारतात कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच बुधवारी 1.25 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

भारतात कोरोनामुळे महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित आहे. गेल्या दिवसभरात महाराष्ट्रात जवळपास 60 हजार नवीन रुग्णांची नोंद आहे. दिल्लीतही वाढता आलेख आहे. गेल्या 24 तासांत जवळपास 5500 प्रकरणे समोर आली आहेत. यूपीमध्येही 5000 च्या जवळपास तर कर्नाटकात सुमारे सात हजर नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Related Posts