IMPIMP

मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त, मृत्यूचे कारण आले समोर

by bali123
Hiren Mansukh

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – काही दिवसापूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन ( mansukh hiren ) यांचा मृतदेह शुक्रवारी (दि. 5) मुंब्य्रात संशयास्पदरित्या सापडला होता. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. अखेर ठाणे पोलिसांना त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे त्यात नमूद केले आहे. हिरेन यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हिरेन (mansukh hiren) यांचे शवविच्छेदन करण्यात आले. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आल्याने त्यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेतील असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी मनसुख यांच्या मालकीची असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. आपण पीडित असूनही पोलिसांकडून एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला होता.
हिरेन यांनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पाठवले होते.

Related Posts