IMPIMP

वृद्ध सफाई कामगाराचा गळा कापून हत्या

by bali123
हे देखील वाचा :

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – नागपूर येथील एका हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या ऑफिसमधील सफाई कामगाराचा एका अज्ञाताने गळा कापून हत्या murder केली आहे. अशी ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. लक्ष्मण मलिक (वय, ६५) असे हत्या murder  केलेल्या या वृद्ध कामगाराचे नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत अधिक माहिती अशी, येथील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोर रजत संकुल ही इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीचे ऑफिस असून, येथे लक्ष्मण मलिक सफाई कामगार म्हणून काम करत होता. मलिक हे मूळचे जरीपटका येथील असून ऑफिस बंद झाल्यावर तो तेथेच राहायचा. रोजच्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी ऑफिसचे सर्व कामगार निघून गेल्यानंतर शेवट मलिक तेथे थांबला. तर मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान ऑफिस उघडण्यासाठी कर्मचारी आले तेव्हा मलिक हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आणि त्याचे हाथ बांधले होते. आणि गळ्यावर वार दिसून आले.

दरम्यान, तेथील कामगारांनी गणेशपेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी इमारतीतील सीसीटीव्हीचे फुटेज घेतले.
ठसे तज्ञ आणि श्वान पथकही घटनास्थळी बोलावून घेतले. या घटनेवरून पोलीस तपास करत आहेत.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंचा नवा ‘मास्टरस्ट्रोक’ !

Mumbai Lockdown : मुंबईतील ‘नाइट क्लब’ सर्वांत आधी बंद करू; पालकमंत्री अस्लम शेख यांचे स्पष्ट संकेत

Related Posts