IMPIMP

महापौरांच्या घरातील कुत्रा म्हणून जन्म व्हावा, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली आपली इच्छा

by bali123
Pune Crime | Molestation Case Sinhagad Road Police Station And Kondhwa

सरकारसत्ता ऑनलाइन – काही लोकांचं आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम असते. अनेकदा त्यांचे हे प्रेम चर्चेचा विषय ठरते. अनेक श्वानप्रेमी त्यांच्या कुत्र्यांना घरच्या सदस्यासारखीच वागणूक देत असतात. काही लोक त्यांच्याबरोबर जेवतात, झोपतात आणि फिरायलाही जातात.  हैदराबादच्या महापौर विजयालक्ष्मी ( vijayalaxmi gadwal ) यादेखील अशा श्वानप्रेमी आहेत. यासंदर्भात विजयालक्ष्मी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये विजयालक्ष्मी या त्यांच्या कुत्र्यासोबत जेवायला बसलेल्या दिसत आहेत. तसेच एका हाताने त्या कुत्र्याला घास भरवतात आणि दुसऱ्या हाताने स्वत: घास घेतात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटतंय की विजयालक्ष्मी या श्वानप्रेमात बेहोश झाल्या आहेत किंवा त्यांना बेहोश कुत्र्यावर प्रेम जडलं आहे.
तसेच प्रश्न हा आहे की, त्यांना कुत्र्यांएवढेच जनतेवरसुद्धा प्रेम आहे का ?
पुढे लिहिले की मी मनापासून प्रार्थना करतो की,
जर महापौरांनी असेच प्रेम दिले तर माझा पुढचा जन्म त्यांच्या घरचा कुत्रा म्हणून व्हावा.’

Related Posts