IMPIMP

भाजपला धक्का ! फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा

by pranjalishirish
1250 crore scam in tree planting campaign during Devendra Fadnavis government

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – देवंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. चौकशी समितीनं यात मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला आहे. भाजपचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राबवलेल्या या मोहिमेत प्रत्यक्ष खर्च लवपल्याची बाब आता समोर आली आहे.

परमबीर सिंह प्रकरण : शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीला ज्युलिओ रिबेरोंनी देले ‘हे’ उत्तर

वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा

सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. विधीमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची चौकशी करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

वृक्ष लागवड मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका

या वृक्ष लागवड मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवला आहे. यासाठीचा प्रत्यक्ष खर्च हा 3688 कोटी झाला आहे. परंतु विधीमंडळात 2438 कोटी खर्च दाखवला आला. इतकंच नाही तर या मोहिमेसाठी 250 कोटी एवढी रक्कम जाहीरातीवर खर्च करण्यात आली आहे. माहिती जनसंपर्क विभागात हे टेंडर रेकॉर्डवर नसल्याचं समोर आलं आहे. आज विधीमंडळ समितीची बैठक होणार आहे. 15 आमदार यांच्या समितीसमोर याबद्दल चर्चा होणार आहे.

‘सचिन वाझेंना व्हायचं होतं ‘सुपरकॉप’, ATS कडून अनेक धक्कादायक खुलासे

नेमकं प्रकरण काय ?

फडणवीस Devendra Fadnavis  सरकारच्या काळात 33 कोटी वृक्षारोपण करण्यात आलं होतं. राज्यात 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागानं वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड केले. ऑक्टोबर 2020 च्या अखेरीस त्यातील 75.63 % रोपं म्हणजे 21 कोटी जिवंत आहेत. त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाकडून शासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था, उद्योगसमूह, खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहिम राबवण्यात आली होती.

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

‘6 महिन्यात चौकशी अहवाल तयार होत असून तो सादर केला जाईल’

ही मोहिम राबवण्यासाठी 2016-17 ते 2019-20 दरम्यान 2429.78 कोटी निधी मिळाला होता. तो पूर्ण वापरण्यात आला. 25 टक्के रोपं जिवंत का राहिली नाही याची चौकशी करण्याची मागणी मंत्री दत्तात्रय भारणे (Dattatray Bharne) यांनी अधिवेशनात बोलताना केली होती. त्यानंतर वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधीमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी केली जाईल. पुढील 6 महिन्यात चौकशी अहवाल तयार होत असून तो सादर केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती.

Also Read : 

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

Related Posts