IMPIMP

मुख्यमंत्र्यांच्या FB लाईव्हमधील अत्यंत ’सत्य वाक्य’, भाजपा नेत्यानं काढला ‘चिमटा’

by sikandershaikh
Thackeray Government | now all shop signs have be done marathi big decision maharashtra Thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राज्यात कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागल्याने सध्या चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्याबाबत चर्चा केली. या संबोधनाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात प्रश्न विचारला, त्यावरुन भाजपा नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

राज्यातील जनतेला प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले लॉकडाऊन करायचे की नाही ? ते म्हणाले माझ्या प्रश्नाचे उत्तरही तुम्ही घरात बसून दिले असेल, हो किंवा नाही… माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय, पण तुमचा आवाज मला ऐकू येत नाही. त्यामुळे ते मला ऐकू येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील आठ दिवस राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीपाहून लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर मास्कशिवाय फिरणे, गर्दी करणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, विनाकारण बाहेर पडणे हे टाळा. शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे मुख्यमंत्री म्हणाले. अत्यंत सत्य वाक्य म्हणजे माझा आवाज तुम्हाला ऐकू येत आहे पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही हे बरोबर असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्याच्या याच वक्तव्यावरून भाजपाच्या केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी टीका केली.

केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांच्या याच शेवटच्या वाक्यावरून ट्विटरवरून टीका करत म्हटले, अकारण, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता संकटात आहे, ती मदतीचा हात मागते. पण, तुम्ही घरात बसून असल्यामुळे त्यांचा आवाजच तुमच्यापर्यंत पोहचत नाही, त्यांना ना मदत, ना दिलासा.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात विरोधकांनाही सुनावले. ते म्हणाले, पक्ष वाढवुया, कोरोना वाढवू नका. विनाकारण आंदोलन करू नका. पुढील काही काळासाठी राज्यात मिरवणुका, मोर्चे, यात्रा आणि आंदोलनांना बंदी घालण्यात येत आहे. एका यंत्रणेवर ताण टाकायचा आणि आपण बेभान वागायचे, हा त्या एका यंत्रणेवर केलेला अमानुषपणा नाही का, सगळ्यांना आयुष्य जगता यावे.

माझे कुटुंब माझे जबाबदारी ही मोहीम आपण यशस्वी केली, त्यानंतर आता आणखी एक मोहीम आपण राबवली पाहिजे. होय, मीच जबाबदार… प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणं म्हणजेच होय मीच जबाबदार. आपली जी बंधने आहेत, घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळालयाच हवे. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मी एक सूचना केली. आपल्याकडे 24 तास असतात, या 24 तासांची नीट विभागणी केल्यास नियंत्रण ठेवता येईल. वर्क फ्रॉम होमद्वारेही आपण कामाची विभागणी करु शकतो. हीच आपली नवीन मोहिम आहे, जी आपली जबाबदारी आहे, होय मीच जबाबदार… असे ठाकरे म्हणाले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

ठाकरे म्हणाले, कोरोनाचे औषध तेव्हाही नव्हते, आजही नाही. केवळ दिलासा तो लसीचा. सध्या लसीकरण सुरू झाले असून 9 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आणखीन दोन-तीन कंपन्या लस देणार आहेत, त्याही लस आपल्याला लवकरच उपलब्ध होतील. मी मुख्यमंत्री म्हणून शिवनेरीवर गेलो. यावेळी, शिवनेरीवर गर्दी कमी होती, पण उत्साह मोठा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिली. वार करण्यासाठी तलवार आणि वार झेलायला ढाल हवी. पण, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना तलवार नाही, पण मास्क ही आपली ढाल आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, सुरुवातीच्या काळात कोरोनाची लढाई आपण धीराने लढलो.
मात्र, मधल्या काळात आपण पुन्हा कोरोनाला गंभीरतेने घेतले नाही, आपण शिस्तीचे पालन करण्यात ढिलाई केली.
तुमच्या मागणीनुसार मंदिरापासून ते लोकलपर्यंत सर्वकाही सुरू केले.
पाश्चिमात्य देशात अजूनही लॉकडाऊन आहे, ब्रिटनमध्ये डिसेंबरपासून लॉकडाऊन आहे.
माझे मंत्रीमंडळातील सहकारी डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा रद्द केला आहे, त्यांनी दाखवलेली ही तत्परता उल्लेखनीय आहे.
त्याबद्दल त्यांचे कौतुक करत मुलासह त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करतो.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

कोविड योद्ध्यांचा सन्मान करायलाच हवा, पण त्यांचा सत्कार करताना आपण कोविड दूत होता कामा नये, याची काळजी घ्यावी.
अमरावतीमध्ये आज हजारांच्या आसपास रुग्ण सापडले आहेत.
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले तर आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडेल? सध्या राज्यात 53 हजार एक्टीव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 7 हजार नवीन रुग्ण सापडले.
मुंबईतील आकडा 800 ते 900 पर्यंत गेला आहे. कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडका मारतेय.
त्यामुळे, मी जिल्हाधिकार्‍यांना बंधन घालण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

Related Posts