IMPIMP

भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘ताजमहालचे नाव बदलून राम महल करणार’

by pranjalishirish
bjp mla surendra singh disputed statement tajmahal said ram mahal will make soon place taj mahal Uttar Pradesh

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आग्रा येथील ताजमहाल Taj Mahal हे शिवकालीन मंदिर होते. योगी सरकारच्या काळात लवकरच त्याचे नाव बदलून राम महाल असे ठेवले जाणार असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

आमदार सिंह यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे Uttar Pradesh  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधले आहे. महाराजांचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत दाखल झाले आहेत. समर्थ रामदासस्वामींनी ज्याप्रमाणे भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला Uttar Pradesh दिल्याचे म्हटले आहे. सिंह यांनी मुरादाबादमधील पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पत्रकारांवर लाठी वापरणारे समाजवाद्यांचे खरे रूप समोर आले आहे. पण योगीजींच्या राजवटीत हे खपवून घेतले जाणार नाही. देशद्रोही मानसिकता असणार्‍या लोकांना कोणीही स्विकारणार नाही. केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ‘ही’ मोठी जबाबदारी

NIA चा मोठा खुलासा ! स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणात दहशतवादी संघटनांचा संबंध नाही !

Sachin Vaze : मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकारी NIA च्या रडारवर ?

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : तब्बल 82 दिवसांनंतर मुख्य सुत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या जाळ्यात

Related Posts