IMPIMP

प्रियंका गांधींनी केली ‘ही’ चूक, भाजप खासदाराने आठवण करुन दिले निवणुकीचे नियम; सोशल मीडियावर प्रियंका गांधी ट्रोल

by bali123
bjp mp schools priyanka gandhi on election law as she says 50 percent congress candidates are aged

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच एकमेकांच्या चूकांवरुन टोलेबाजी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी priyanka gandhi यांनी बुधवारी केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर त्या ट्रोल होऊ लागल्या आहेत. प्रियंका गांधी priyanka gandhi यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांची फसगत झाली आहे. प्रियंका गांधी सोशल मीडियावर ट्रोल होत असताना भाजपचे लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी प्रियंका गांधी यांना निवडणूक नियम माहित नसतील तर शांत बसावं, असा सल्ला दिला आहे.

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

प्रियंका गांधी priyanka gandhi यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, केरळमध्ये आमचे 50 टक्के उमेदवार 20 ते 40 वयोगटातील असल्याचा खूप अभिमान वाटतो. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा अनुभव आणि ज्ञानामुळे ते संयुक्तपणे एक शक्तीशाली ताकद बनतात. मला आशा आहे की, केरळच्या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळेल, जेणेकरुन युडीएफचा दृष्टीकोन समजेल, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले.

जिलेटिनच्या कांड्या सचिन वाझेंनी खरेदी केल्या; एनआयएकडून खुलासा

प्रियंका गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे असा उल्लेख केला आहे. त्यावरुन प्रियंका गांधी यांना सोशल मीडियावर त्यांच्या राजकीय समज आणि ज्ञानाबद्दल विचारणा होऊ लागली आहे. अशातच लडाखचे भाजपचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी प्रियंका गांधींना ट्विट करुन उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, जर तुम्हाला सक्रिय राजकारण आणि निवडणूक नियम माहित नसतील तर शांत बसणं एक चांगला पर्याय आहे, असा टोला लगावला आहे. भारतात निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 वर्षे आहे, आता तुमच्या 20 ते 25 वयोगटातील उमेदवारांचे काय ? असा प्रश्न ही खासदार नामग्याल यांनी केला आहे.

भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये किमान वय 20 केले आहे. यावरुन सोशल मीडियावर प्रियंका गांधी यांना त्यांच्या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts