IMPIMP

देशमुख यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोर वाढला; भाजपच्या ‘या’ नेत्याची मागणी

by bali123
bjp narayan rane criticises and demands cm uddhav thackeray resign

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची आता केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणी सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर आता राजकारण तापले आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे uddhav thackeray यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ‘परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने 15 दिवसांत चौकशी करून अहवाल द्यावा, असे माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबद्ल बहुतांशी राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. या केसशी संबंधित असलेल्या वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री uddhav thackeray प्रतिक्रिया का देत नाहीत किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत?, असा सवालही उपस्थित केला आहे.

Also Read :

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

 

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Related Posts