IMPIMP

Pankaja Munde on Maratha Reservation : ‘मराठा समाज बांधव विचारतायत, आमचा प्रामाणिक नायक कोण?’

by nagesh
bjp pankaja munde react over supreme court decision maratha reservation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) महत्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दरम्यान यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही ट्विट करत यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज बांधव आता आमचा प्रामाणिक नायक कोण, अशी विचारणा करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी केंद्राला करुन दिली ‘त्या’ कलमांची आठवण, तत्परतेने निर्णय घेण्याची मागणी

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करतो, निकाल असा लागणारच नाही असे खरेच कोणाला वाटले होते का? मराठा जीवनातील संघर्ष हा मोर्चा, बैठका, आरोप -प्रत्यारोप आणि राजकारणाखाली दबून गेला… झाल तर मी मी नाही तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात प्रश्नचिन्ह तरुणाईसमोर आहे. आमचा प्रामाणिक नायक कोण ? कोण खरा टक्का आरक्षणाचा सांगेल आणि देईल हा प्रश्न मराठा समाज बांधव विचारत असल्याचे मुंडे Pankaja Munde यांनी म्हटले आहे. दरम्यान, 1992 मध्ये इंद्रा सहाणी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा घातली होती. 9 सदस्यीय खंडपीठाने मराठा आरक्षणावर निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले होते. या याचिकांवरील सुनावणी दरम्यान बुधवारी निर्णय देताना, गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नसून, आरक्षण देणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Also Read :

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

Related Posts