IMPIMP

CM ठाकरे स्वत: कार चालवत पोहोचले रिलायन्स हॉस्पिटलमध्ये, रुटीन चेक-अपनंतर पुन्हा घरी

by bali123
Chief Minister Uddhav Thackeray visit hn reliance hospital mumbai for routine checkup

मुंबई (Mumbai news): सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी (दि. 29) सकाळी अचानक स्वत:कार चालवत दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये (HN Reliance Hospital) दाखल झाले होते. सुरुवातीला ते कशासाठी दाखल झाले याबद्दल माहिती दिली नव्हती. मात्र मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून ते नियमित तपासणीसाठी (routine checkup) रुग्णालयात आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. तासाभराच्या तपासणीनंतर ते पुन्हा रुग्णालयातून घरी परतले आहेत. cm uddhav thackeray visit hn reliance hospital mumbai for routine checkup

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे मंगळवारी आपल्या शासकीय वर्षा निवासस्थानी होते. तिथूनच एचएन रिलायन्स हॉस्पिटल हे जवळ असल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे गाडी चालवत रुग्णालयात पोहोचले. मुख्यमंत्री ठाकरे नेहमी रुटीन चेकअपसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) जात असतात. पण आज ते एचएन हॉस्पिटल (hn reliance hospital) मध्ये आले होते. यापूर्वी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले होते. मुख्यमंत्री रुग्णालयात येणार असल्याने आसपासच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title : Chief Minister Uddhav Thackeray visit hn reliance hospital mumbai for routine checkup

Related Posts