IMPIMP

देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले – ‘राहुल गांधींचे आजोबा असताना चीनने आपल्या जागा घेतल्या होत्या’

by Team Deccan Express
china had taken our place when rahul gandhi grandfather in power says devendra fadnavis

बेळगाव : वृत्तसंस्था बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. राहुल गांधींचे आजोबा असताना चीनने आपल्या जागा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला दाखवून दिलं की हा पूर्वीसारखा भारत राहिलेला नाही. तिथून चीनला परत पाठवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. एक इंच देखील जमीन दिली नाही, हा कमजोर भारत नसल्याचे पंतप्रधानांनी दाखवून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

कोरोना लसीसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस devendra fadnavis म्हणाले, जगातले केवळ 5 देश कोरोनावर लस बनवू शकले. त्या पाच देशांमध्ये माझा भारत देश आहे. सर्वाधिक लसीकरण भारत देशात झाले आहे, असे देखील ते सांगायला विसरले नाहीत.

ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही
शिवसेनेवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस devendra fadnavis म्हणाले, इथं मराठी माणसासाठी येताय, तिथे मुंबईमध्ये मराठी माणसाला बेड मिळत नाही. काही लोक जिंकण्यासाठी नाही, हरवण्यासाठी उभे आहेत. इतके वर्ष संघर्ष करत होते ते कुठेच दिसले नाहीत. नवीन लोकं मतं खाण्यासाठी उभा आहेत. संजय राऊत हे महाराष्ट्र समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला मदत करत आहे. ही बळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना थेट इशारा, म्हणाले – ‘मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा…’

तर मराठी माणूस तुम्हाला खांदा देणार नाही
शिवसेनेवर टीका करताना फडणवीस म्हणाले, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला अशी स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतान जयंती साजरी केली जाते. टिपू सुलतान की जय म्हणणार असाल तर मराठी माणूस तुम्हाला खांदा देणार नाही. मराठी माणूस भोळा आहे पण मूर्ख नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts