IMPIMP

लसीकरणावरून नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, ‘पोलिओप्रमाणेच…’

by nagesh
congress leader nana patole letter chief minister and demand door door corona vaccination

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : देशात एक मे नंतर 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम’ राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशांतील लसीकरणांवरून दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. मात्र, राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर आता नाना पटोले Nana Patole यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून म्हटले, की ‘कोरोनावर मात करण्यासाठी आपली यंत्रणा सर्व पातळ्यांवर काम करत आहे. मात्र, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच जगभरात प्रभावी शस्त्र ठरलेले आहे. इस्रायलसारख्या छोट्या देशाने ते करून दाखवले आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर देशांनीही लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे’.

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

तसेच देशात महाराष्ट्रानेही लसीकरणात मोठी आघाडी घेऊन एक कोटींपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. ही लसीकरण मोहीम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे, हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, स्वयंसेवी संस्था-संघटना, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग यांची मदत घेता येईल. याशिवाय पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात अशीच मोहिम राबवण्यात आली होती. याच धर्तीवर घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश येईल, असे नाना पटोले Nana Patole यांनी म्हटले आहे.

Also Read :

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

Chandrakant Patil : ‘अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, झेपत नसेल तर पद सोडाव’

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

 

 

Related Posts