IMPIMP

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले…

by amol
modi-saha

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. त्यातच सातत्याने होत असलेल्या इंधनवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर ट्विटरवरून निशाणा साधला. ‘वो जुमलों का शोर मचाते है, हम सच का आईना दिखाते है’, असे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोना व्हायरस, भारत-चीन या दोन्ही देशांतील तणाव यांसारख्या मुद्यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की जून 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती 93 डॉलर प्रतिबॅरल होत्या आणि तेव्हा पेट्रोल 71 तर डिझेल 57 रुपये प्रतिलिटर होतं. पण गेल्या 7 वर्षांत कच्चे तेल 30 डॉलरने स्वस्त झालं. पण तरीही पेट्रोलचे दर सेंच्युरी गाठत आहे आणि डिझेलही त्याच्यामागेच आहे.

2021 मध्ये 19 वेळा दरवाढ

2021 मध्ये 19 वेळा दरवाढ झाली आहे. 15 फेब्रुवारी, 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या काळात पेट्रोल 17.05 तर डिझेल 14.58 रुपयांनी महाग झालं आहे, ही माहिती सांगणारी आकडेवारी राहुल गांधी यांनी सादर केली.

आम्ही सत्याचा आरसा दाखवतो

‘वो जुमलों का शोर मचाते है, हम सच का आईना दिखाते है’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच त्यांनी इतरही मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला.

Related Posts