IMPIMP

ED Raids On Anil Parab | महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का ! परिवहन मंत्री अनिल परबांशी संबंधित 7 ठिकाणी ईडीची छापेमारी

by Team Deccan Express
ED Raids On Anil Parab | ed searches are on in maharashtra at seven location on premises linked to maharashtra minister and shivsena leader anil parab

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ED Raids On Anil Parab | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या संबंधित सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) छापेमारी (Raid) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (Money Laundering Case) अनिल परब यांच्यावर ईडीकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात आणखी एक मोठी खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमध्ये ईडीच्या हाती पुरावे काय लागणार हे पहावे लागणार आहे. (ED Raids On Anil Parab)

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी याबाबत तक्रार केली होती. यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. आता ईडीने अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट आणि वाहतूक विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांच्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते.(ED Raids On Anil Parab)

दरम्यान, ईडीकडून अनिल परब यांच्यासंबंधित सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर आता ईडीकडून लवकरच अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. राज्यातील आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई केल्याने महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का मानला जात आहे.

 

Web Title :- ED Raids On Anil Parab | ed searches are on in maharashtra at seven location on
premises linked to maharashtra minister and shivsena leader anil parab

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts