IMPIMP

Goa Municipal Election 2021 : गोव्यात पालिका निवडणुकीत काँग्रेसकडून भाजपला धोबीपछाड, CM प्रमोद सावंतांना धक्का

by pranjalishirish
goa municipal Pramod Sawant election 2021 sankhali municipal council congress wins by election bjp loses

पणजी : वृत्तसंस्था-  गोव्यातील सहा नगरपालिका आणि पणजी महापालिका यासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि.22) जाहीर झाले. यामध्ये भाजपने पुरस्कृत केलेले उमेदवार बहुतेक ठिकाणी विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत Pramod Sawant  यांनी त्यांच्या साखळी मतदारसंघातील साखळी पालिकेच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवाराचा काँग्रेसच्या उमेदवाराने परभाव करुन भाजपला धक्का दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी साखळी पालिकेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची होती.

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

साखळी हा मुख्यमंत्री सावंत Pramod Sawant यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. साखळी पालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 साठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच सरळ लढत झाली होती. पक्षीय पातळीवर ही निवडणूक झाली नसली तरी दोनच उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीला भाजप विरुद्ध काँग्रेस असे लढतीचे स्वरुप आले होते. ही जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यांचा उमेदवार 18 मतांनी पराभूत झाला. हा भाजपसाठी व मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

‘सचिन वाझेंना व्हायचं होतं ‘सुपरकॉप’, ATS कडून अनेक धक्कादायक खुलासे

भाजप पुरस्कृत म्हणून दशरथ आजगावकर यांच्यासमोर रमेश आमशेखर यांचे आव्हान होते. त्यात धर्मेश सगलानी आणि प्रवीण ब्लेगन यांच्या नेतृत्वाखाली आमशेकर रिंगणात उतरले होते. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. कारण पालिकेत 5-5 असे बलाबल असल्याने या निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार जिंकेल त्या पक्षाकडे पालिकेची सत्ता जाणार होती. त्यामुळे पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

साखळी पालिका आपल्याकडे ठेवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत  Pramod Sawant यांनी निवडणुक प्रचाराची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. भाजप पुरस्कृत उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सावंत यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा पराभव करुन ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली आणि भाजपला मोठी चपराक दिली. त्यामुळे साखळी पालिकेवर काँग्रेसची सत्ता आली असून ही भाजपसाठी आत्मचिंतनाची बाब बनली आहे.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

पणजी पालिकेवर भाजपचा झेंडा

पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. 30 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपला 30 पैकी 25 जगांवर विजय मिळाला. बहुमतासाठी 16 जागांचा जादुई आकडा भाजपने पार करत पणजी महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत केवळ 5 जण निवडून आले.

Also Read : 

‘अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली’, परमबीर सिंग यांच्या ‘त्या’ 100 कोटींच्या लेटरमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले याची माहिती आमच्याकडे, सत्य सर्वांसमोर येईल

Sudhir Mungantiwar : ‘मुंबई पोलिसांना आता खंडणी यार्ड म्हटलं जाईल’

…म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना कोरोना होत नाही, भाजप आमदाराचे अजब विधान

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

Related Posts