IMPIMP

Virar Hospital Fire : ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’

by Team Deccan Express
virar hospital fire bjp kirit somaiya slams thackeray government and rajesh tope

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील hospital fire अतिदक्षता विभागात मध्यरात्रीनंतर आग लागली होती. दरम्यान आगीनंतर रुग्णालयातील अन्य रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. यावरुन आता भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

… म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी असे म्हटले आहे. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घरी बसवलं पाहिजे. असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.

विरारमधील आगीच्या hospital fire दुर्घटनेवर  राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. आज विरारमधील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत hospital fire रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. परवा नाशिक मधील घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडरा आणि भांडूप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्वैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य आहे. पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही, अशी उद्विग्नता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts