IMPIMP

भाजपच्या खा. रक्षा खडसेंना ‘कोरोना’ची लागण ! Tweet करत दिली माहिती

by sikandershaikh
mp raksha khadse

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. खुद्द रक्षा खडसे (raksha khadse ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. नंतर एकनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसे खेवलकर यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता त्यांच्या सुनबाई तसंच रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे (raksha khadse ) यांना कोरोना झाला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या रक्षा खडसे ?

रक्षा खडसे यांनी ट्विट करत लिहिलं की, रात्री अचानक प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानं कोरोना टेस्ट केली. माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तरी गेल्या 8 दिवसात जे माझ्या संपर्कात आलेत त्यांनी स्वत:ची कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती स्थिर आहे. सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी असंही त्या म्हणाल्या आहेत.

राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचं ऑफिस झालंय का ?

Related Posts