IMPIMP

Nitesh Rane | तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला, नितेश राणेंची भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका

by bali123
maharashtra vidhan sabha adhiveshan live bjp nitesh rane target bhaskar jadhav over mla suspension

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Nitesh Rane | विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरुन विरोधी पक्षाचे 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाईवरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी भास्कर जाधव यांच्यावर प्रहार केला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, आम्ही कोकणातले आहोत, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) कोकणातले आहेत, कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहेत, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

तालिका खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सोमवार (दि.5) पासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरुन भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. यावरुन नितेश राणे म्हणाले, आमचे 12 आमदार सैनिकासारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन त्यांचे निलंबन करण्यात आले. तालिका खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

भास्कर जाधव नरकासूर विश्वास ठेऊ नका

नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधताना, या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून कही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरुन आमचे सरकारही लढले आहे. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे असं नितेश राणे म्हणाले.

भास्कर जाधव हा ‘संकासुर’

नितेश राणे यांनी ट्विट करुन भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भास्कर जाधव हा ‘संकासूर’ आहे, असे नितेश राणे म्हणाले. ते पुढे म्हणाले, कोकणाच्या दशावतारात संकासुराने 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे चोरून समुद्राच्या तळाशी शंकात जाऊन लपला. त्याच प्रमाणे भास्कर जाधव यांनी संविधानाने आमदारांना दिलेले अधिकार चोरून नेले आणि निलंबनाची कारवाई केली अशी टीका राणे यांनी केली.

Web Title : maharashtra vidhan sabha adhiveshan live bjp nitesh rane target bhaskar jadhav over mla suspension

Related Posts