IMPIMP

केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे’

by pranjalishirish
maratha reservation hearing Supreme court chandrakant patil slams thackeray govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे.अंतिम सुनावणीनंतर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी सुनावणीतील युक्तीवादाचा हवाला देत ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

शिवसेनेला धक्का ! सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्षपदी संजना सावंत

सध्या मराठा आरक्षण याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान एका युक्तिवादाचा हवाला देत चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी एक ट्विट केले आहे. “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis : ‘लवंगी होता तर ते एवढे घाबरले का?’

“राज्य सरकारला असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा कायदा संवैधानिक आहे. हाही भक्कम युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. कर्तव्यशून्य, अपयशी आणि कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे,” असे देखील चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  म्हणाले आहे. “या सरकारच्या मनात थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर आता तरी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्त्व दाखवा. भलेही फसवणुकीने तुम्ही सत्तेत आले असाल! आता आलाच आहात, तर थोडे तरी स्वकर्तृत्त्व दाखवा,”असे सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले.

Aslo Read : 

‘पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं !’

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठं वक्तव्य; म्हणाले…

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

घरचा आहेर देत ठाकरे सरकारमधील मंत्र्यानंच केलं ‘असं’ आवाहन, म्हणाले – ‘… तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा’

‘आर्किटेक्ट’ एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग, नागपुरात राष्ट्रवादीकडून आंदोलन

‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका

100 कोटी खंडणी वसुलीच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख यांची भेट, पुढं काय होणार?

Related Posts