IMPIMP

MLA Pratap Sarnaik । आ. प्रताप सरनाईकांची विधानसभा अधिवेशनात मोठी मागणी, म्हणाले – ‘… नाहीतर मला क्लिन चिट द्या’

by bali123
MLA Pratap Sarnaik | MLA pratap sarnaik taunts uddhav thackeray saying that cm shinde given 1800 crores fund for development thane

मुंबई न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) रडारवर असणारे शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन दरम्यान सरनाईक यांची उपस्थिती होती. त्यावेळी सभागृहात ‘मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. म्हणून सरकारने मला ‘क्लिन चिट’ (clean chit) द्यावी, अशी मागणी प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी विधानसभा अधिवेशन (Assembly session) दरम्यान केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रताप सरनाईक यांनी सभागृहात सक्तवसुली संचालनालय (ED) कडून होत असलेल्या कारवाईबाबत आपली भूमिका मांडली, आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की, ‘मला ईडीकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकांना भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी दिली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचा तपास हा सक्तवसुली संचालनालय (ED) ने घेतला. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे सरकारवरही होत आहे, असे सरनाईक यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना सरनाईक म्हणाले, ‘मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिलं आहे की, घोटाळा केला असेल तर
प्रताप सरनाईक अटक झाली पाहिजे पण जर घोटाळा झाला नसेल तर तो अहवाल बाहेर आणा
नाहीतर क्लिनचिट द्या. जर मी गुन्हा केला असेल तर मला फासावर लटकवले पाहिजे, असं देखील
प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी
विधानसभेच्या सभागृहातच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल दाद मागितली आहे.

Web Titel : MLA Pratap Sarnaik maharashtra assembly session otherwise give me a clean chit pratap sarnaik demand in the house

Related Posts