IMPIMP

Modi Cabinet Expansion । राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

by bali123
Raosaheb Danve | I want to see brahmin as maharashtra chief minister says union minister Raosaheb Danve

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Union Cabinet Expansion । केंद्राच्या मोदी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी (Modi Cabinet Expansion)  सकाळपासूनच बड्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे सुरु आहे. त्यातच रमेश पोखरियाल निशंक, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक बड्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. त्यातच महाराष्ट्रातील देखील काही मंत्र्यांची नावे समोर येत होती. त्यात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे वृत्त पुढं आल्याने राज्यात चर्चेला उधाण आलं. मात्र या राजीनाम्याच्या वृत्तावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे यांना पक्षातून कोणाचा देखील फोन आलेला नाही. मला राजीनामा देण्यासही सांगितले गेले नाही. म्हणून रावसाहेब दानवे यांच्यावरील संकट गेल्याच म्हटलं जात आहे. त्याव्यतीरिक्त रावसाहेब दानवे दिल्लीला पोहोचल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. रावसाहेब दानवे यांचा दोनवेळा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार देखील सोपवण्यात आला होता.

या दरम्यान, आज (बुधवारी) सायंकाळी 6 वाजता केंद्रातील मोंदीच्या मंत्रिमंडळाचा (Union
Cabinet Expansion) विस्ताव होणार आहे. तसेच, सकाळपासूनच काही मंत्र्यांचं राजीनामा
(Resigned) देखील घेण्यात येत आहे. त्यात इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना मोठी संधी
मिळाल्याची चर्चा देखील सुरु आहे. कपिल पाटील, ज्योतिरादित्य शिंदे, भारती पवार, याव्यतिरिक्त
नारायण राणे यांची मोदींच्या मंत्रिमंडात मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे.

Web Titel : Modi Cabinet Expansion raosaheb danves first big reaction live after discussion of resignation

Related Posts