IMPIMP

जयंत पाटील यांना मिळणार गृहमंत्रिपद?, चर्चांना उधाण

by pranjalishirish
ncp may be appoint jayant patil as home minister in place of anil deshmukh after sachin vaze case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी पोलिस दलात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गच्छंतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख यांच्याकडील गृह खात्याचा पदभार काढून घेणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. पण असे जरी असले तर राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास त्या पदावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील Jayant Patil  यांची निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीसमोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर सचिन वाझे यांची अटक. या सर्व प्रकारानंतर ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यावरून सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करण्यात आली आहे. तर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जावा, असे महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही यावर विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

दरम्यान, जर अनिल देशमुख यांच्याकडे असलेला गृहमंत्रिपदाचा पदभार काढून घेतला तर त्यांच्या जागी कोण असणार याही चर्चा सुरु आहेत. त्यामध्ये राजेश टोपे यांचेही नाव घेतले जात होते. मात्र, आता जयंत पाटील  Jayant Patil यांचे नाव पुढे आले आहे. जयंत पाटील  Jayant Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत अनुभवी नेते असल्याने याचा फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

Aslo Read : 

‘…मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का ?’

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Related Posts