IMPIMP

‘शिवसेनेची रोज वाट लागते; पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले मजा बघतात’

by bali123
nilesh rane criticizes state government topic assembly and dhananjay munde sindhudurg

सरकारसत्ता ऑनलाइन – भाजप नेते नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारसह धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेची मजा पाहत असतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले नीलेश राणे ?
आपल्या ट्विटमध्ये नीलेश राणे लिहितात, शिवसेनेची (ShivSena) रोज वाटत लागत आहे. पण राष्ट्रवादी (Nationalist Congress Party – NCP) आणि काँग्रेसवाले (Indian National Congress) मजा बघत बसलेत. एका अधिवेशनात एक मंत्री आणि एक जवळचा अधिकारी गेला आहे. शिवसेनेचे जुने आणि निष्ठावान नेते उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत आहेत. तरी कळून न आल्यासारखी शिवसेनेची वर्तणूक आहे. आज धनंजय मुंडे हे सभागृहात असे दिसत आणि वागत होते जसे ते वारीतून परत आले आहेत.

‘… तर मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षप्रमुख पण राहणार नाहीत, जुने शिवसैनिक त्रासात’
आपल्या आणखी एका ट्विटमध्ये पुढं बोलताना नीलेश राणे म्हणाले, जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये वाईट अवस्था झाली आहे. इतकी की ते सभागृहात आम्ही मेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार असं बोलून गेलेत. उद्धव ठाकरे हे फक्त 35 टक्के शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेत सर्व्हे आणि प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर मुख्यमंत्री पक्षप्रमुख पण राहणार नाहीत, अशी टीकाही राणे यांनी केली.

‘जुन्या शिवसैनिकांची ठाकरे सरकारमध्ये वाईट अवस्था असं का म्हणाले राणे ?’
अधिवेशनात मराठी भाषेतील शब्दांऐवजी इंग्रजी शब्दांच्या वापरावरून शिवसेना नेते दीवाकर रावते ( Diwakar Raote ) यांनी सर्व नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिवसेनेलासुद्धा धारेवर धरलं. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा संवर्धनावर एकही शब्द व्यक्त केला नाही. मी मेल्यावर बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी भाषेसाठी काय केलं, असं त्यांनी विचारलं तर काय उत्तर देऊ, असं म्हणत रावते यांनी संताप व्यक्त केला. यावरूनच नीलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

अशोक चव्हाण यांचे आवाहन, म्हणाले – ‘मराठा आरक्षणाबाबत राजकारण नाही तर सहकार्य करा’

तीरथ सिंह रावत यांचे 4 वर्षांपूर्वी कापले होते तिकीट; आता भाजपनं दिलं मुख्यमंत्रिपद

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

देवेंद्र फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना प्रश्न, म्हणाले – ‘…मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा ?’

Related Posts