IMPIMP

‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’, जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या माजी DG मीरा बोरवणकर

by pranjalishirish
no officer no employee police department who dont ask money says former DG meera borwankar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक दावा केला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. आता याच पार्श्वभूमीवर माजी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर Meera Borwankar  यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. पोलीस दलात असा एकही अधिकारी, कर्मचारी नाही जो पैसे खात नाही किंवा एकही पोलीस ठाणे नाही जिथे पैसे जमा होत नाहीत, असा मोठा दावा मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

पोलीस प्रशासनात प्रचंड पैसे खाल्ले जातात

मीरा बोरवणकर Meera Borwankar  यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड पैसे खाल्ले जातात. असे एकही पोलीस स्थानक नाही ज्या ठिकाणी पैसे जमा होत नाहीत. पोलीस दलामध्ये पैसे खात नाही असा अधिकारी कर्मचारी नाही. प्रत्येक पोलीस स्थानक राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला असल्याचे मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

राजकारण्यांच्या मर्जीने नियुक्त्या

पोलिसांच्या नियुक्तीबाबत बोलताना मीरा बोरवणकर यांनी सांगितले की, पोलिस प्रशासनात राजकारण्यांना हव्या तशा नियुक्त्या केल्या जातात. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परिस्थिती बिघडल्याचे, मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

महाराष्ट्र पोलीस दलाची रया घालवली

महाराष्ट्र पोलिसींग पूर्ण संपलं आहे. महाराष्ट्रानं केरळ, तेलंगण या राज्यांकडून शकायला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांनी मिळून पोलीस दलाची रया घालवली, असा आरोप मीरा बोरवणकर  Meera Borwankar यांनी केला.

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

पुण्यात आपल्यावरही आरोप झाले

मुलाखती दरम्यान मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगितला. पुण्यात असताना दोन एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी आपल्यावरही आरोप झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलात जात आणि विचारधारेवर आधारीत पोलीस अधिकारी आहेत. ते त्याप्रमाणे वागत असल्याचा दावा बोरवणकर यांनी केला.

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

सचिन वाझेच्या मागे अनेक जण असणार

सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करताना मीरा बोरवणकर यांनी सांगितले की, सचीन वाझे यांनी केलेला प्रकार हा एकट्याने करणे शक्य नाही. सचिन वाझे यांच्यामागे अनेक जण असण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखा हे खंडणी वसुली केंद्र झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्या आरोपांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असेही मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

Also Read

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts