IMPIMP

Pandharpur : राज्यात ‘करेक्ट’ कार्यक्रम करुन दाखवतो – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

by Team Deccan Express
pandharpur by election devendra fadnavis criticizes mahavikas aghadi government

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आखडा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अनेक दिग्गज नेते पंढरपूरात तळ ठोकून आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर दौरा करुन विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यानंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच पंढरपूरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून देऊन तुम्ही त्यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो, अशी फटकेबाजी फडणवीस यांनी केली.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी देऊन भालके यांना तगडे आव्हान दिले आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते आमने-सामने आले आहेत. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अनेक गैरकारभार केले आहेत. यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पंढरपूरच्या लोकांना पहिली संधी मिळाली आहे. पंढरपूरकरांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊन त्यांचा कार्यक्रम करावा, मी राज्यात त्यांचा करेक्ट कार्यक्रम करुन दाखवतो, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसाची गरज लागत नाही. सरकार बदलण्यासाठी निवडणुकीची गरज नाही. सरकार कधीही बदलू शकते, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सरकार बदलाचे वक्तव्य केले आहे. यापूर्वी दुपारी झालेल्या सभेत त्यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला.

संजय राऊत काहीही बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही. केंद्राने सर्वात जास्त पीपई कीट, सर्वाधिक मास्क, जास्तीत जास्त लसी राज्याला दिल्या आहेत. एकीकडे लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे परिपत्रकं काढली जात आहेत. जर असे असेल तर मग लसीकरणासाठी लसी आल्या कुठून. या लसी केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच लसीकरण झाले ना, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आम्ही राजकारण करत नाही. आम्ही मदत करण्यास तयार आहोत. मात्र तुमचा जो उठतो तो सोम्यागोम्या केवळ राजकारण करतो. कोरोनाच्या नावाने हे योग्य नाही, असे म्हणत फडणवीस devendra fadnavis यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

Read More : 

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts