IMPIMP

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

by Team Deccan Express
Ajit Pawar | ajit pawar reply chandrakant patil on his criticism

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी जोरदार प्रचार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar दुसऱ्यांदा पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलं. चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का ? भाजप ग्रामीण भागातील प्रश्न सोडवू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचे आवाहन पंढरपुरमधील मतदारांना केले.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवार ajit pawar पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. शेतकरी जगला तर राज्य जगेल. विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात. तुमचे सरकार होते त्यावेळी तुम्ही काय दिले ? असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास करणार, मात्र, कोरोनाचे संकट आले. खरं तर ही निवडणूक व्हायला नको होती, मात्र भाजपच्या आठमुठे पणामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, असे देखील अजित पवारांनी ajit pawar यावेळी सांगितले.

‘अजित पवार सत्तेसाठी हपापलेले, जास्त गमजा मारू नका, कालचक्र फिरत असतं’; चंद्रकांत पाटलांचा टोला

राज्यात कोरोनाची लाट आली असून कोरोनाच्या लाटेत सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्याचे झाले आहे. अनेक नेते सोडून गेले. आता तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, तालुक्याला डबल निधी देतो, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. राज्यात असलेल्या साखर कारखान्यांचा प्रश्न महाविकास आघाडीच सोडवू शकते. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कारखाने मी स्वत: संचालक म्हणून निवडून देणार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला. आजची ही सांगता सभा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विजय निश्चित असल्याचा दावा अजित पवार ajit pawar यांनी केला.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

 

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

 

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts