IMPIMP

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

by bali123
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील jayant patil यांनी शनिवारी सांगली पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणावर भाष्य केलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या तपासाबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांचे पत्र म्हणजे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. कोणाची तरी सहानुभूती मिळवून हे प्रकरण वेगळया दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

सरकार पूर्ण स्थिर असून वाझे प्रकरणावरून सरकारला कोणताही धोका नसल्याचे पाटील jayant patil म्हणाले, हिरेन मृत्यू प्रकरणात कितीही मोठ्या अधिकाऱ्याचा सहभाग असो, त्याच्यावर कारवाई होणारच. एटीएसचा तपास अधिक गतीने करून या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी सरकार गंभीर आहे. त्याचबरोबर एनआयएला तपासात सहकार्यही करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

अँटिलिया प्रकरणात स्फोटके असलेली गाडी कोणी ठेवली, स्फोटके नागपूरहून आली की, कोठून आली आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला, याचे सत्य समोर आलेच पाहिजे. राज्य सरकारची सुरुवातीपासूनच या प्रकरणात ज्या ज्या अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे, ते सुटू नयेत, ही भूमिका आहे. मात्र, कोणाची तरी सहानुभूती मिळविण्यासाठी व तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी आता असे पत्र समोर येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

Related Posts