IMPIMP

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती

by bali123
Pune News | Huge response to BJP's Chakkajam agitation in Pune; The announcement was heard in Katraj area, the presence of former minister Pankaja Munde

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | राज्यात आज भाजपच्या (BJP) वतीने सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला (OBC movement) पुण्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी मंत्री पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde) यांनी आंदोलनाला उपस्थिती लावत सरकारवर जोरदार आरोप केले. यानंतर पंकजा मुंडे व शहरातील आमदार आणि कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडत जोरदार घोषणाबाजी (Announcement) केली. यामुळे कात्रज (Katraj) व परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांना पोलीस यंत्रणेने रस्त्यावर ठाण न मांडण्याची विनंती केली. पण त्याला न जुमानता जोरदार आंदोलन सुरू केले. तासभर हे आंदोलन झाल्यानंतर पंकजा मुंडे या पुढील आंदोलनाला रवाना झाल्या. त्यानंतर आवढ्या काही वेळात आंदोलन संपले. Pune News | Huge response to BJP’s Chakkajam agitation in Pune; The announcement was heard in Katraj area, the presence of former minister Pankaja Munde

राज्यभरात आज भाजपच्या वतीने ओबीसी आरक्षण (OBC reservation) आणि विविध मागण्यांसाठी आंदोलन होत आहे.
पुण्यात माजी मंत्री पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde), खासदार गिरीष बापट (MP Girish Bapat), आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी,
भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे,
अतुल चाकणकर यांसह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी नऊ वाजल्यापासूनच कात्रज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.
तर हळूहळू आंदोलक जमा झाले. साधारण साडे आकरा वाजण्याच्या सुमारास पदाधिकारी जमा होऊ लागले. काही वेळाताच मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आणि आंदोलनाला सुरुवात झाली.
त्यानंतर काहीच वेळात पंकजा मुंडे, खासदार गिरीष बापट, शहर अध्यक्ष, आमदार दाखल झाले.
त्यानंतर गिरीश बापट व पंकजा मुंडे यांनी या आंदोलकाना मार्गदर्शन केले.
त्यानी यावेळी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तर आंदोलन आम्ही करणारच असे म्हणत प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी झाल्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी रस्त्यावर उतरत रस्त्याच्या मधोमध ठाण मांडले.
यावेळी कार्यकर्ते देखील होते. त्यांनीही ठाण मांडत चक्का जाम केला.
दहा ते पंधरा मिनिटं पंकजा मुंडे या आंदोलनात सहभागी झाल्या आणि त्यांनी येथून पुढील
आंदोलनाकडे रवाना झाल्या. यानंतर भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आणि
भाजप शहर अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी या आंदोलनाची धुरा घेतली.
काही वेळ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलनाला पूर्ण विराम दिला आहे.

पोलिसांनी या आंदोलनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोणताही गोंधळ होणार नाही,
याची खबरदारी घेतली होती. तर आंदोलन आयोजकांना देखील सांगण्यात आले होते.
तर आंदोलन उरकते घेण्यास सांगितले होते. पंकजा मुंडे येथून जाताच आंदोलन उरकण्यात आले.

कोरोनाला (corona) आमंत्रण… जबाबदार कोण
राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध आहेत. तिसरी लाट राज्याच्या उंबरठ्यावर आहे.
त्यामुळे सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या काळात भाजपने केलेले आंदोलन आणि त्यामुळे झालेली तुडुंब गर्दी तसेच या गर्दीकडून नियमांची झालेली ऐसीकितैसी पाहून पुणेकरामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तिसरी लाट येण्यास आंदोलन तर कारणीभूत ठरणार नाही ना अशी भीतीही व्यक्त होत आहे.
एकीकडे शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे.
पण या आंदोलनात काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी साधा मास्क वापरण्याचे देखील कष्ट घेतले नसल्याचे दिसून आले.

Web Title : Pune News | Huge response to BJP’s Chakkajam agitation in Pune; The announcement was heard in Katraj area, the presence of former minister Pankaja Munde

Related Posts