IMPIMP

Raju Shetty : पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार, महाविकास आघाडीत बिघाडी?

by bali123
raju shetty firm on contesting pandharpur mangalwedha by election tension arises for ncp candidate

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोटनिवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात उतरवला असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा नारळ राजू शेट्टी raju shetty यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्याला उमेदवारी दिली. उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतलं का, असा सवाल उपस्थित केला.

Post Office : 1 एप्रिलपासून बदलला पैसे काढण्याचा आणि जमा करण्याचा नियम

ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये बुडवले. अशा लोकांकडे निवडणुका लढवण्यासाठी पैसा आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार आहे. परंतु त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही, अशी टीका राजू शेट्टी raju shetty यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रसच्या उमेदवारांवर केली. प्रचाराचा शुभारंभ करताना संघटनेचे रविकांत तुपकर, तानाजी बागल, रणजित बागल, विजय रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

राजू शेट्टी raju shetty पुढे म्हणाले, राज्यात असलेल्या महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची भूमिका आपल्याला मान्य नसल्याने पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांची एफ.आर.पी आणि 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावं, सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही सरकारविरोधात आंदोलन करु असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू शेट्टी यांची मनधरणी करण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काहि दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र राजू शेट्टी raju shetty यांनी आज आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोरील अडचणी वाढवल्या आहेत.

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

जयंत पाटील मागण्याचा विचार करण्याबाबत बोलत आहेत. मात्र शेतकऱ्यांना एफआरपी आणि घरगुती वीज बील माफ करा याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना आम्हाला विचारत घेतले होते का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत दोन साखर कारखानदार निवडणूक लढवत आहेत. भाजपकडून समाधान अवताडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके हे निवडणूक लढवत आहेत. या दोन उमेदवारांकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसा आहे. मात्र, शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी पैसा नाही हे दुर्दैवी असल्याची खंत राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली. दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे या निडणुकीत चुरस निर्माण झाली असून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Also Read :

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts