IMPIMP

आठवलेंनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करताच राष्ट्रपती म्हणाले…

by bali123
ramdas athavale met president demand implementation presidents

नवी दिल्ली : राज्यातील विविध मुद्यांवरून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ramdas athavale यांनी या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावर राष्ट्रपतींनी त्याबाबत विचार करू, असे आश्वासन दिल्याचे आठवले म्हणाले.

ठरलं ! शिमग्यानंतर होणार मंत्रिमंडळात फेरबदल ?

अँटिलिया स्फोटके प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, 100 कोटींची हफ्ता वसूली प्रकरण यांसह इतर काही प्रकरणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. त्यानुसारच, आठवले यांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे दिले आहे. तसेच जोपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त होत नाही, तोपर्यंत या गंभीर आरोपींची निष्पक्ष सखोल चौकशी होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

Jitendra Awhad : ‘रश्मी शुक्लांचे अपक्ष आमदारांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न’

दरम्यान, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर काही नेतेमंडळींनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता रामदास आठवले ramdas athavale यांनी ही मागणी केली आहे.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts