IMPIMP

Jitendra Awhad : ‘रश्मी शुक्लांचे अपक्ष आमदारांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न’

by bali123
minister jitendra awhad has leveled allegations against then state intelligence commissioner rashmi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेर महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्विट करत शुक्ला यांच्यावर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला अपक्ष आमदरांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी ट्विट करुन आरोप करताना म्हटले, शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजप बरोबर रहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत, असे ट्विट गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.

शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

दरम्यान, पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. परंतु, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन केलेल्या आरोपामुळे भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काल कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना अनेक मुद्यांवर लक्ष वेधले होते. आता त्यांनी अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीपासून दूर करण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला यांनी केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

 

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts