IMPIMP

‘रश्मी शुक्लांसह पोलीस खात्यातील असे 4 ते 5 अधिकारी शरद पवार आणि आमच्या नजरेत आले होते’

by bali123
rashmi shukla phone tapping were known all pawar sanjay raut advises thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – यड्रावकर यांनी केलेला गौप्यस्फोट नाही कारण हे सर्वांना माहिती होतं. यड्रावकर किंवा इतर आमदारांशी रश्मी शुक्ला स्वत: संपर्क करुन नव्याने निर्माण होणाऱ्या ठाकरे सरकारसोबत जाऊ नका, भाजप सरकारसोबत जा, तुमच्या सर्वांच्या फाईली तयार आहेत, असे धमकावले जात होते. हे माहिती असताना देखील महाविकास आघाडीच्या सरकारने शुक्ला यांना सहा महिने पदावर ठेवले याचे मला आश्चर्य वाटते, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut यांनी सांगितले.

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

पोलीस खात्यातील असे 4 ते 5 अधिकारी शरद पवार आणि आमच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. युतीचं सरकार आल्यानंतर बाळासाहेबांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावून मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे आजही जुन्या सरकारशी निष्ठा ठेवून आहेत, तुम्हाला राज्य करु देणार नाहीत, अडचणी निर्माण करतील असे बजावले होते. यानंतर तात्काळ त्यांची बदली करा किंवा त्यांना रजेवर पाठवा अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांना मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांनी तातडीने रजेवर पाठवले होते, अशी माहिती संजय राऊत sanjay raut यांनी दिली. तसेच वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर देवेंद्र फडणवीस ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊत यांनी म्हटले.

PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

सीताराम कुंटे यांनी एक अहवाल दिला असून त्यामध्ये फोन टॅपिंग संदर्भात मोठे खुलासे करण्यात आले आहेत. भाजपला फायदा होईल, राजकीय फायद्यासाठी हे अधिकारी आमदारांचेच नाही तर खासदारांचे आणि पत्रकारांचे फोन टॅप करत होते. शरद पवार यांचे देखील फोन टॅप केले गेले. ही गंभीर बाब असल्याचे संजय राऊत म्हणाले. सरकारमध्ये जे बसलेत त्यांना या गोष्टीचे गांभीर्य असायला पाहिजे. अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मान ठेवून राज्य करता येत नाही. एपीआयपासून अधिकाऱ्यांपर्यंत कशी बगलेत दाबली जातात ते पाहिले आहे. यामधून सरकारने बोध घ्यावा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Also Read : 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

 

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

 

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

 

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Related Posts