IMPIMP

Video : बिहार विधानसभेत ‘राडा’ ! धक्काबुक्की, शिवीगाळ करत सत्ताधारी आणि विरोधी आमदार भिडले

by bali123
ruckus ensued bihar assembly over recovery illicit liquor ruling-and opposition mlas clashed

सरकारसत्ता ऑनलाइन – आज बिहार विधानसभेत bihar assembly दारूवरून तुफान राडा झाला आहे. मुजफ्फरपूर येथे शाळेत सापडलेल्या अवैध दारू प्रकरणी सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीनं महसूलमंत्री रामसुरत राय यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले. यानंतर एकच गोंधळ झाला. धक्काबुक्की, शिवीगाळ सुरू झाली. पाहून घेऊ अशा धमक्याही त्यांनी एकमेकांना दिल्या.

नेमकं काय झालं ?
रामसुरत राय यांच्या भावाकडून मुजफ्फरपूरमध्ये चालवण्यात येणाऱ्या शाळेतून अवैध दारू जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी महसूलमंत्री रामसुरत राय यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. हा मुद्दा गरम असतानाच बजेटवरील चर्चेदरम्यान तेजस्वी यावद यांनी पुन्हा दारूबंदीवर बोलण्यास सुरुवात केली. यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. यावेळी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक असते, तर उपमुख्यमंत्रिपद हे घटनात्मक नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदार खूपच संतापले.

पुढं काय झालं?
भाजप आमदार संजय सरावगी आणि मंत्री जनक राम यांनी तेजस्वी यादव यांच्या विधानावर आक्षेप घेतला. यानंतर तेजस्वी यांचे मोठे भाऊ तेजप्रताप सत्ताधारी आमदारांकडे अंगुलीनिर्देश करत काही बोलले. यावरून सत्ताधारी जास्तच संतप्त झाले. यानंतर दोन्ही बाजूचे आमदार आमने-सामने आले. इतकंच नाही तर ते शिवीगाळ करत धक्काबुक्की करू लागले. हा वाद एवढा चिघळला की, मार्शलना पाचारण करून आमदारांना बाजूला करावं लागलं.

‘हा प्रकार घडल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित केलं’
विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिंह यांनी हा प्रकार घडल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित केलं. कामकाज स्थगित केल्यानंतरही सभागृहात विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज विधानसभेत जे काही घडले ते घडता कामा नये, असं स्पष्ट आणि कठोर शब्दांत सांगितलं.

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला प्रश्न, म्हणाले – ‘तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?’

PM मोदींच्या जीवनावर पुन्हा बनणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली’, सचिन वाझेंच्या WhatsApp Status ने खळबळ

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे पुणे, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले – ‘निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करा

Related Posts