IMPIMP

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्यानं सरकार किंवा शिवसेनेला काय लाभ होईल? निवृत्त पोलिस म्हणाले…

by bali123
sachin vaze what will be benefit shiv sena if explosives are placed outside mukesh ambani house

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सचिन वाझे ( Sachin Vaze ) प्रकरणाचा तपास सध्या एनआयए (NIA) आणि एटीएस ( ATS ) करत आहे. परंतु या प्रकरणामुळं ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. वाझे यांच्या अटेकनंतर आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या वर्षा निवासस्थानी यासंदर्भात बैठकी देखील सुरू आहेत. निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे ( Suresh Khopade ) यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत सविस्तर आपलं मत मांडलं आहे.

‘… आणि मीडिया, जनता, विरोधक यांना खुश करण्यासाठी एनकाऊंटर सुरू झाले’
आपल्या पोस्टमध्ये सुरेश खोपडे म्हणतात, सचिन वाझें Sachin Vaze च्या करामतीमुळं मुंबई पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि आणखी चर्चा व्हायला पाहिजे. मुंबई पोलीस कमिशनर म्हणून 3 वर्षे नंतर उत्तर मुंबई विभागाचे अॅडिशनल पोलीस कमिशनर म्हणून मी अडीच वर्षे मुंबईत काम केलं होतं. मुंबईतील वातावरण तिथली गुन्हेगारी हे माझ्या सारख्याला अलिबाबाची गुहाच होती. मुंबई शहरातील एनकाऊंटर यावर मी खूप मटेरियल गोळा केलं होतं. मारल्या गेलेल्या बळींची सर्वांगानं माहिती गोळा करण सुरू केलं. दोन निलंबित एनकाऊंटर स्पेशालिस्ट माझ्या हद्दीतील पोलीस स्टेशनला जोडले गेले होते ते संशोधन पूर्ण करू शकलो नाही. पण या विषयाचं भयानक वास्तव पुढं आलं आणि उत्तरही सापडलं की, इथली गुन्हे न्याय व्यवस्था कालबाह्य आहे. ती बदलण्याऐवजी तात्पुरता इलाज म्हणून गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा देण्यासाठी तसंच मीडिया, जनता, विरोधक यांना खुश करण्यासाठी एनकाऊंटर सुरू झाले. सचिन वाझे हे त्याचेच प्रॉडक्ट.

‘दुसऱ्याच्या बापासाठी कुणीही आपल्या मिशा काढायला तायर होत नाही’
आपल्या पोस्टमध्ये पुढं खोपडे लिहितात, पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय कुठलाच एनकाऊंटर होऊ शकत नाही. मग हे स्पेशालिस्ट एकदम आयुक्त किंवा गृहमंत्र्यांना भेटत. मधल्या अधिकाऱ्यांना फाट्यावर मारत असत. अमाप पैसा, अमाप दहशत, अमाप प्रसिद्धी, अमाप अधिकार. असे वाझे कुणाला घाबरतील ? त्यांच्यावर अंकुश कोणता ? ख्वाजा युनूसचा काटा सचिन वाझेंनी ज्या पद्धतीनं काढला होता ती फार अमानवी केस होती. ते लवपण्यासाठी केलेली धडपड अशीच पोरकट होती. एनकाऊंटर स्पेशालिस्ट असे अघोरी व धोकादायक कृत्य कुणासाठी करत असावेत ? समाजात शांतता सुरक्षितता रहावी म्हणून ? एक कर्तव्य, जबाबदारी म्हणून ? सत्याची चीड म्हणून ? पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून ? की, माझ्या निरीक्षणावरून यापैकी कोणतंच नाही. दुसऱ्याच्या बापासाठी कुणीही आपल्या मिशा काढायला तायर होत नाही. व्यक्तिगत फायदा (आर्थिक, मेहेरबानी, भावनिक…) असल्याशिवाय असं कृत्य करायला तयार होत नाहीत.

‘अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्यानं सरकार/शिवसेनेला काय लाभ होणार ?’
सुरेश खोपडे लिहितात, अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्यानं गृहमंत्री अगर मुख्यमंत्री यांना काय लाभ होणार ? सरकार अगर शिवसेना यांना कुठला लाभ होणार ? काही होईल असं मला तरी वाटत नाही. वाझेंना व्यक्तिगत मोठा लाभ होईल असा त्याचा होरा असावा. मुकेश अंबानी हे जगातील एक श्रीमंत व्यक्ती… त्यांच्या जिविताला असलेला धोका टाळल्याचे, गुन्ह्याचा तपास केल्याचे व आरोपीला बेड्या ठोकल्याचे श्रेय त्याला मिळणार होते. राज्य व केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शाबसकी मिळाली असती. अर्णबच्या केसमध्ये केंद्रीय गृहमंत्री नाराज होते ते खुश झाले होते. या सगळ्याचा फायदा ख्वाजा युनूसची जी केस त्याचे विरुद्ध चालू आहे त्यातून सुटण्यास मदत झाली असती असा हेतू वाझेंच्या मनात असावा असं आतातरी वाटतं. पुढं वेगळीही कारणं निघू शकतात. पाहूत.

‘सचिन वाझे, परमबीर सिंग, भूषण उपाध्याय यांच्या निर्मितीची मुळं व्यवस्थेतच’
सुरेश खोपडे यांनी असंही लिहिलं की, अशा एनकाऊंटर स्पेशालिस्टचा राजकारणात दबदबा असतो. वाझे तर शिवसैनिकच आहेत. प्रचंड पैसा असल्यानं ते खूप होत्याचं नव्हतं करणारे असतात. कोणत्याही सत्ताधारी नेत्याला तात्काळ रिझल्ट देणारे नोकरशहा हवे असतात. नवख्या राजकारण्यांना त्याची चाल समजून येत नाही. बऱ्याच वेळा मनोधैर्य खच्ची व्हायला नको म्हणून राजकारणी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. मग ते सरकारलाच गोत्यात आणतात. त्यातून सचिन वाझे, भूषण उपाध्याय… निर्माण होतात. महाराष्ट्रात 7 लाखांपेक्षा जास्त लोक असताना सरकारला एका सचिन वाझेंची गरज का असावी ? तो एवढा शिरजोर का बनावा ? कारण प्रशासनात सगळ्या लोकांचा वापर कसा करायचा याची शास्त्र शुद्ध व्यवस्था नाही. मुळात पोलीस व्यवस्था कालबाह्य आहे. मलाच फार समजतं वा अक्कल आहे असा माझा दावा नाही पण इतर दुसरा पर्याय मिळेपर्यंत मी केलेल्या शिफारशी विचारात घ्या अशी मी प्रत्येक सरकारला विनंती करत असतो. तशी महाविकास आघाडी सरकारलाही केली आहे. बहुतांश मीडिया, जनता, विरोधी पक्ष, विचारवंत, साहित्यिक अशा प्रश्नांची उत्तरे व्यक्तीमध्ये शोधतात. मग सचिन वाझे, परमबीर सिंग, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उद्धव ठाकरे या नावांचा उच्चार होतो. वेळोवेळी नाव बदलतात. व्यवस्था तीच राहते. महाराष्ट्राच्या या अवस्थेस कोण जबाबदार ? कोण दोषी ? माणसात 10 टक्के दोष आणि 90 टक्के इथली व्यवस्था/दोषी आहे. सचिन वाझे, परमबीर सिंग, भूषण उपाध्याय (Bhushan Upadhyay) … या महामानवांच्या निर्मितीची मुळं या व्यवस्थेत दिसतात. या सरकारलाही मी या शिफारशी पाठवल्यात.

मी माझं कम करतो… कुणी वंदा या निंदा….. असंही आपल्या पोस्टमध्ये शेवटी खोपडे यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

Sanjay Raut : ‘वाझे प्रकरणामुळं सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, सरकार पडणं शक्य नाही’

56 % कोरोना लसी वापराविना पडून; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

Related Posts