IMPIMP

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

by bali123
shiv sena mp sanjay raut ncp chief sharad pawar and leadership upa

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut यांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं असे विधान केले होते. संजय राऊत यांच्या विधानानंतर काँग्रेसमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. शिवसेना यूपीएचा भाग नाही, त्यामुळे उगाच सल्ला देऊ नये अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली होती. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्यावर टीका करताना, संजय राऊत sanjay raut शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का ?असा सवाल केला होता. आता नाना पटोले यांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! खासदार उदयनराजे भोसलेंना जोरदार ‘धक्का’, जाणून घ्या

तर मला आनंदच आहे
नाना पटोले यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटले की, कोणाला मी शरद पवार यांचा प्रवक्ता वाटत असेल तर मला त्याचा आनंदच आहे. पवार यांच्या विधानाचं समर्थन करणे हा माझ्यासाठी गौरव आहे. शरद पवार यांचे काम खूप मोठे आहे. त्यांच्या कामासाठी केंद्रातील मोदी सरकारने त्यांना पद्मविभूषण दिले आहे. मी शरद पवार यांचा असण्याचा-नसण्याचा प्रश्न नाही, असे राऊत sanjay raut यांनी म्हटले.

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

तेव्हा ही मंडळी कुठे होती ?
ज्यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीका होत होती त्यावेळी मी बोललो आहे. त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला मी प्रत्युत्तर दिले आहे. त्यावेळी मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा प्रवक्ता होतो का ? सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीका होत होती त्यावेळी ही मंडळी कुठे होती ? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

Pravin Darekar : ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ केंद्राने राज्यात लक्ष घालावे

राहुल गांधी यांना पप्पू म्हणत टिंगल केली
राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं जातं, त्यांची टिंगल केली गेली. सोनिया गांधी यांच्यावरही टीका करताना विरोधकांनी आपली मर्यादा ओलांडली. त्यावेळी मी त्यांच्यासाठी पहाडासारखा उभा राहिलो. ही गोष्ट काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना माहित नाही. मात्र, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना याची कल्पना आहे, असे राऊत म्हणाले. युपीए मजबूत करणं देशाची गरज आहे. ती कोण करतंय याला महत्त्व नाही. मात्र ती भक्कम होणे आणि उभी राहणे गरजेचे असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.

Also Read:
‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts