IMPIMP

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

by bali123
the spectacle that is going on under the name of coronas second wave should stop sanjay nirupam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानंतर आता पुन्हा लॉकडाऊन लागू होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरून काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम sanjay nirupam यांनी टीका केली. ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली आता जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाऊनची कोणतीही आवश्यकता नाही’, असे निरुपम म्हणाले.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यानंतर मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्याजवळ स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी लॉकडाऊन आणि सरकारी निर्बंधांविरोधात निदर्शने केली. या हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी संजय निरूपम sanjay nirupam हेही उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना निरुपम म्हणाले, ‘मागील लॉकडाऊनमुळे लोक खूप उद्धवस्त झालेली आहेत. या सर्व लोकांचा व्यवसाय आणि त्यांची आर्थिक स्थिती अद्याप स्थिरस्थावर झाली नाही. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाऊनची कोणतीही आवश्यकता नाही. काही सावधानता बाळगण्यासाठी हॉटेल व्यावसायिकही तयार आहेत. मुंबईचे सर्वसामान्य नागरिकही तयार आहेत’.

दरम्यान, ‘लॉकडाऊनची धमकी देऊ नये. सरकारने उद्योजकांच्या अडचणी ऐकाव्यात, आमचे म्हणणे ऐकावे आणि जेवढे लवकर होईल तेवढे काही दक्षता बाळगण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी मागणी मी काँग्रेसच्या वतीने करतो, असेही निरुपण sanjay nirupam म्हणाले.

Also Read:
‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

Related Posts