IMPIMP

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

by pranjalishirish
thieves break rani mahal jai vilas palace gwalior madhya pradesh maratha scindia dynasty police

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – ग्वाल्हेरच्या सिंधिया राज घराण्यातील प्रसिद्ध ‘जय विलास’ पॅलेसच्या Jay Vilas Palace राणी महालात घरफोडी झाली आहे. सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जय विलासमधील घटनेने पोलिसांच्या हालचालीत खळबळ उडाली आहे. स्निफर डॉगच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. हा महाल १२ लाख वर्गफीट पेक्षाही मोठा आहे. या सुंदर शाही महालाची किंमत जवळ जवळ ४,००० करोड रुपये आहे. महालमध्ये ४०० पेक्षा अधिक खोल्या आहेत.

अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या जय विलास पॅलेसमध्ये Jay Vilas Palace घरफोडी झाल्याची बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी हात पाय हालवले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घरफोडी झाल्याची माहिती जय विलास पॅलेसच्या भागातून पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने बोटांचे ठसे आणि आवश्यक पुरावे जप्त केले आहेत. जय विलास पॅलेसमधून चोरटयांनी काय चोरी केली आहे हे या क्षणी कळू शकले नाही.

जय विलास पॅलेसची खासियत.

जय विलास पॅलेस पाहण्यासाठी परदेशातून लोक येतात. या पॅलेसला श्रीमंत जयाजी राव सिंधिया यांनी १८७४ मध्ये बांधले होते. हा पूर्ण राज महाल सुमारे ४० एकरात पसरलेला आहे. या पॅलेसच्या जयाजी राव सिंधिया म्यूजियमच्या भागाला १९६४ मध्ये लोकांच्यासाठी चालू केले.

हा राजवाडा शेकडो परदेशी कामगारांनी बांधला होता. या संपूर्ण वाड्यात ४०० खोल्या आहेत. या खोल्यांची खास गोष्ट म्हणजे यांच्या भितींना सोन्या चांदीने कारिगरी केली आहे.

राज घराण्यात ३५०० किलोचे दोन झुंबर लावले गेले आहेत. असे सांगितले जाते की हे झुंबर लावले गेले होते तेव्हा छतावर १० हत्तींना ७ दिवसांपर्यंत ठेवण्यात आले होते. यावरून वाड्याचे छत किती मजबूत आहे हे लक्षात येते. १८७४ मध्ये या वाड्याची किंमत २०० मिलियन डॉलर होती. याची निर्मिती सर मायकल फिलोसे यांनी केले. ज्यांना नाइटडूड ची उपाधी दिली गेली.

राजवाड्यातील ४०० खोल्यांपैकी हि एक खास खोली ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव सिंधिया यांची खोली आहे. आजही ही खोली त्यांच्या नावाने जपली गेली आहे. माधवरावांनी आपल्या आवडीचे आर्किटेक आणि पुरातन वस्तू या खोलीत ठेवल्या आहेत. या संग्रहालयाचे आणखीन एक विशेष गोष्ट अशी की चांदीची रेल ज्याचे ट्रेक जेवणाच्या टेबलावर आहेत. ही ट्रेन अतिशय खास मेजवानीवर पेय पुरवठा करते. या हॉलमध्ये इटली, फ्रांस, चीन आणि अन्य देशातील दुर्मिळ वस्तू उपलब्ध आहेत.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही… मग नियुक्त्या का थांबल्या ?, स्पर्धा परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्विटरवरुन सरकारला प्रश्न

Related Posts