IMPIMP

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी शशिकला यांचा राजकारणातून ‘संन्यास’

by sikandershaikh
sasikala

चेन्नई : वृत्त संस्थातामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि एआयएडीएमके (AIADMK) च्या नेत्या व्हीके शशिकला (sasikala) आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांचा भाचा टी.टी.व्ही दिनाकरण यांनी सांगितले होते. मात्र आता शशिकला यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये त्यांनी आपण राजकीय संन्यास घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर काही दिवसांतच शशिकला यांनी हा निर्णय घेतला आहे.

शशिकला (sasikala) यांनी जारी केल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहून डीएमके पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. मी राजकारणातून संन्यास घेत आहे कारण, तामिळनाडूमध्ये आपल्याला एआयएडीएमकेचे सरकार बनावे. पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे मी प्रार्थना करते. आगामी काळात मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणार आणि जयललिता यांच्या मार्गावर जाणार आहे. एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे आणि डीएमकेला निवडणुकीत पराभूत करावे. असेही या निवेदनात शशिकला यांनी म्हंटल आहे.

तामिळनाडूची निवडणूक रंगदार

माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणूकीत भासणार आहे.
तसेच, राजकारणातील सुपरस्टार रजनीकांत यांची माघार, अभिनेते कमल हसन यांची राजकारणातील
एन्ट्री त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या सर्व घडामोडींमुळे तामिळनाडूची निवडणूक अत्यंत रंगदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातच, आता शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याने निवडणुकीआधीच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर शशिकला यांची तुरुंगातून सुटका

६६ कोटींच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणात शशिकला यांना २०१७ साली चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
हि शिक्षा भोगून २७ जानेवारी २०२१ रोजी शशिकला तुरुंगातून बाहेर आल्या आहेत.
त्यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप होता.
जयललिता यांचा मानलेला मुलगा व्ही एन सुधाकरण तसेच शशिकला यांच्या जवळचे समजले जाणारे
नातेवाईक जे इलावारसी यांनाही या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. तामिळनाडूत २३४ जागांसाठी एक टप्प्यात मतदान होणार आहे.
तामिळनाडूत ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी निकाल लागणार आहेत.

Related Posts