IMPIMP

‘दंगाबाज’, ‘धंदाबाज’ म्हणत ममता बॅनर्जींची भाजपवर जोरदार टीका, PM मोदींनाही घेतलं निशाण्यावर

by sikandershaikh
mamata-banerjee-narendra-modi

हुगळी : वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज हुगळी येथे रॅली काढली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप (Bharatiya Janata Party – BJP) वर सडकून टीका केली. भाजपला त्यांनी दंगाबाज आणि धंदाबाज म्हणून संबोधलं. आगामी विधानसभा निवडणुकीत मी गोल कीपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या, भाजप नेहमीच म्हणतो तृ्णमूल काँग्रेस (All India Trinamool Congress) टोलाबाज आहे. मात्र मी म्हणते भाजप दंगाबाज आणि धंदाबाज आहे. नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे दंगेबाज आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मी गोलकीपर असेल आणि भाजपला एकही गोल करताना येणार नाही.

‘बंगालवर गुजरातचं शासन नाही’

ममता म्हणाल्या, बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोंदींचं बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.

मोदींचं नशीब ट्रम्पपेक्षाही खराब

पीएम मोदींवर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यापेक्षा खराब नशीब पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पहात आहे असं म्हणत त्यांनी मोदींची थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना केली.

Related Posts