IMPIMP

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत अजित पवारांचे विधान, म्हणाले…

by bali123
will mumbai police commissioner be transferd important statement of ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली होणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण जोपर्यंत कोणतेही ठोस पुरावे हाती लागत नाहीत, तोपर्यंत तेच अधिकारी काम करत राहतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी मंगळवारी (दि. 16) मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सचिन वाझे प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली आहे. धागेदोरे कुठे जातात हे पाहत आहोत. पण अधिकारी बदली हा राज्याच्या प्रमुखांचा निर्णय असल्याचे ते म्हणाले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणाला दोष देऊ नका. वाझेंबाबत आम्ही तातडीने कारवाई केली आहे. एनआयए त्याचे काम करत आहे. तर एटीएस त्यांचे काम करत आहे. तपासातून जे सत्य बाहेर येईल. त्यानुसार पुढे कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले. सोमवारी राष्ट्रवादीची नियमितपणे होणारी बैठक पार पडली. आमच्या कामकाजाचा तो भाग होता. शरद पवार साहेब नाराज नाहीत, त्यांच्या नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कोणताही मतभेद नसल्याचे ते म्हणाले.

अंबानींना घाबरवून BMC निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts