IMPIMP

अंबानींना घाबरवून BMC निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

by bali123
Does shivsena raise funds for BMC elections by intimidating Ambani ?, BJP attacks Shiv Sena - ram kadam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने सुरु केला आहे. स्फोटकाने भरलेली गाडी आणि गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू नंतर भाजपने महाविकास आघडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातच या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपने सरकारवर हल्लाबोल केला. सचिन वाझे हे या प्रकरणाचा तपास करीत होते. सचिन वाझे यांना अटक होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केली होती. मात्र, वाझे यांच्या अटकेनंतर भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

भाजपचे आमदार राम कदम ram kadam यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हिंदीमध्ये ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राम कदम ram kadam यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता ? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझे यांची उघड वकिली का करत आहेत ? वाझे यांचा बचाव कशासाठी केला जात आहे ? गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला वाचवणं योग्य आहे का ? असे प्रश्न राम कदम यांनी विचारले आहेत.

राम कदम यांनी केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे, महाराष्ट्र सरकार निवडणुकीसाठी निधी गोळा करत आहे का ? या दिशेनं तपास करण्याची हिंमत दाखवली जाणार का ? त्या दृष्टीने तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कोट्यावधी लोकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणाऱ्या मुकेश अंबनी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचे कारण काय ? एक साधारण एपीआय दर्जाचा अधिकारी एवढं मोठं षडयंत्र एकटा रचू शकतो का ? असा सवाल देखील राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात साधू संत सुरक्षीत आहेत ना अंबानी यांच्यासारखे उद्योगपती असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे.

 

NIA नं तपास पूर्ण झाल्यानंतर बोलावं, विनाकारण बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

 

Related Posts