IMPIMP

MahaTET Exam Scam Case | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण ! तुकाराम सुपेच्या घर, कार्यालयात आणखी मोठं घबाड सापडलं

by nagesh
mahatet-exam-scam-case-another-rs-33-lakh-was-recovered-tukaram-supes-house-and-offices

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MahaTET Exam Scam Case | शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैरव्यवहार झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी (MahaTET Exam Scam Case) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना पुणे पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक केली. पोलिसांच्या छापेमारीत सुपे यांच्या घरातून दोन वेळा रोकड जप्त करण्यात आली होती. मात्र काल (गुरुवारी) तिस-यांदा सुपेच्या घर आणि कार्यालयांमध्ये केलेल्या छापेमारीत (Raid) आणखी 33 लाख रुपये सापडले आहेत.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

राज्यात मागील महिन्याभरात आरोग्य भरती (Health Recruitment), म्हाडा भरती (MHADA Recruitment) या परीक्षांमध्ये पेपर फुटीमुळे
खळबळ उडाली आहे. यातच TET गैरव्यवहार प्रकरणी (MahaTET Exam Scam Case) पुणे पोलिसांनी (Pune Police) केलेल्या छापेमारीमध्ये
आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच दीड किलो सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत
तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे. तर, काल झालेल्या छापेमारीत आणखी 33
लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.

तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल 1 कोटी 59 लाख रुपयांची रोकड तसेच एकूण 44 वेगवेगळ्या
प्रकारचे दागिने असा सुमारे 2 कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज जप्त केला होता. तपासात सापडलेल्या दागिन्यांचे मुल्यांकन सोनारांमार्फत करण्यात
आले होते. तर, दुसऱ्यांदा टाकलेल्या धाडीमध्ये 2 कोटी रुपयांची रोकड, दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले आहेत. याअगोदर सुपे याच्या
घरातून 88 लाख रुपयांची रोकड, दागिने, 5 लाख 50 हजारांच्या ठेवी असा 96 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

दरम्यान, TET गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुपे व सावरीकर यांच्यासह अन्य 6 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने तुकाराम सुपे यांच्या पोलीस कोठडीमध्ये 30 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. प्रथमवर्ग न्या. एस. जी. डोलारे (Justice. S. G. Dolare) यांनी हा आदेश दिला आहे.

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा दणका, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकार

Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार कटिबद्ध’ – अजित पवार

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा विजा कडाडणार, नववर्षाआधी राज्यात ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

 

Related Posts