IMPIMP

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : कंपनीसाठी जमीन देण्याच्या बहाण्याने महिलेची एक कोटीची फसवणूक

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | कंपनीसाठी जमीन देतो असे सांगून महिलेकडून एक कोटी 20 लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतर जागेची इसार पावती देण्यास टाळाटाळ करुन घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 10 जानेवारी 2024 ते 3 मार्च 2024 या कालावधीत निगडी प्राधिकरण (Nigdi Pradhikaran) येथे घडला आहे.

याबाबत एका महिलेने बुधवारी (दि.3) निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख Prasad Pradeep Konde-Deshmukh (रा. दत्तकृपा बंगला, जगदीश सोसायटी, धनकवडी) याच्याविरुद्ध आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या जे.आर.एल. रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीच्या (JRL Realty and Infrastructure Pvt. Ltd. company) कामासाठी जागा शोधत होत्या. त्यावेळी आरोपीने आपल्याकडे 15 आर जागा असल्याचे सांगितले.

आरोपी आणि फिर्य़ादी यांच्यामध्ये तीन कोटी 90 लाख रुपयांना या जागेचा व्यवहार झाला. 30 टक्के रक्कम घेऊन इसार पावती देण्याचे आश्वासन आरोपीने दिले. महिलेने प्रसाद कोंडे याच्यावर विश्वास ठेवून एक कोटी 20 लाख रुपये आर.टी.जी.एस द्वारे त्याच्या बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर फिर्य़ादी यांनी इसार पावती बाबत विचारणा केली. प्रसाद याने इसार पावती देण्यास टाळाटाळ करुन घेतलेले पैसे देखील परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने निगडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी (PI Shatrughan Mali) करीत आहेत.

Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी : भोसरीतील जगताप टोळीवर ‘मोक्का’! आयुक्तांची 8 टोळ्यांमधील 39 जणांवर कारवाई

Related Posts