IMPIMP

Pune Crime | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 47 लाखाचा गंडा, पुण्यातील प्रकार

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | शेअर बाजारात गुंतवणूक (Stock Market Investment) केल्यास मोठा फायदा होतो आणि मोठा परतावा मिळतो, असे आमिष दाखवत शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल 47 लाखांना फसवल्याचा (Fraud) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) आरोपी किशोर शंकर चेन्नूर Kishore Shankar Chennur (रा. धनकवडी) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याप्रकरणी एका व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची चैन्नूर याच्यासोबत गेल्यावर्षी ओळख झाली. शेअर बाजारात गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो, असे आमिष त्याने फिर्यादी यांना दाखवले. फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी चेन्नूर याच्याकडे गुंतवणुकीस काही रक्कम दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

व्यावसायिकासह पाच जणांकडून चेन्नूरने 47 लाख रुपये घेतले. चेन्नूरने सुरुवातीला काही दिवस परतावा दिला.
पण, त्यानंतर चेन्नूरने परतावा देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे (API Shendge) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 47 lakh fraud with the lure of investing in the stock market

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक! महिलेला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, पुण्यातील खराडी परिसरातील घटना

Pune RTO | नागरिकांनी ‘रॅपीडो अ‍ॅप’ वापरु नये, पुणे प्रादेशिक परिवहनकडून आवाहन

Shambhuraj Desai | पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – शंभूराज देसाई यांची माहिती

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

 

Related Posts