IMPIMP

Pune Crime | जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत अंगावर लोहरस पडून आठ कामगार जखमी

by nagesh
Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   जेजुरीजवळ असलेल्या आयएसएमटी (ISMT) कंपनीत सोमवारी सकाळी मोठा अपघात (Pune Crime) घडला. तापलेला लोहरस वाहून नेणाऱ्या लॅडलची साखळी (Wire Rope) तुटल्याने हा लोहरस वाहून नेणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडला (Pune Crime) आणि आठजण भाजून निघाले. यातील चार कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोरेगाव मार्गावर ही कंपनी आहे. या कंपनीत लोखंडी सळ्या बनविल्या जातात. कंपनीच्या भट्टीत 1600 – 1800 डिग्री तापमानावर लोखंड वितळविले जाते. त्यातून लोहरस तयार करुन हा लोहरस वेगवेगळ्या आकारांच्या आणि जाडीच्या सळयांच्या साच्यात ओतला जातो. आणि सळ्या तयार केल्या जातात.

 

अपघातात क्रेन चालक जितेंद्र सिंग (25), सुजित बरकडे (25), चुनेज बरकडे (22), अरुणकुमार सिन्हा (52),
आकाश यादव (22), दुर्गा यादव (40), शिवाजी राठोड (38), मनोरंजन दास (35)
यांच्या अंगावर वितळता लोहरस पडला आहे.
यातील चारजण गंभीर जखमी असून त्यातील जितेंद्र सिंग याला पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
इतर सात जणांवर जेजुरीत खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी सुदैवाने मोठा अपघात झाला नाही.
ज्यावेळी वरुन हा लोहरस पडला, त्यावेळी तो कंपनीत्या छतावर बसलेल्या पक्षांवर देखील उडाला होता.
यावेळी पक्षांची जागीच राख झाली. त्यामुळे कंपनीत आणि परिसरात शोकाकूल परिस्थिती आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 8 injured in ismt company in jejuri after iron falls on body the condition of four is critical

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा महिला मोर्चा मंत्रालयावर

Sachin Vaze | सचिन वाझेंचा जामीन अर्ज 18 नोव्हेंबरला निकालासाठी

Girish Mahajan | ‘जितेंद्र आव्हाड प्रकरण सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे’ – गिरीश महाजन

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर

 

Related Posts